रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश,तासगावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

0
2

तासगाव : दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या तासगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. सुरुवातीला जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तासगावचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

तालुक्यात पावसाचे अल्प प्रमाण, घटलेली भूजल पातळी, द्राक्षबागांवरील संकट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे परिस्थिती मांडली. प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळाची तीव्रता लक्षात घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

तासगावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दुष्काळ जाहीर होणे ही पहिली पायरी असून, आता द्राक्षबागा व अन्य पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, सिंचनासाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी पुढील पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका रोहित पाटील यांच्या समर्थकांनी मांडली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here