वळसंग,संकेत टाइम्स : जत तालुका मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोरोना रुग्ण संख्याच्या वाढीने हॉटस्पॉट बनला आहे.शासन आणि स्थानिक प्रशासनाने अनेक कडक निर्बंध लागू केले. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेपासून मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न गहण झाला आहे. जनतेने मदतीच्या आणि परतीच्या नावाखाली स्थानिक भागात कार्यरत असणाऱ्या बचत गट, मायक्रो फायनान्स कंपन्याकडून रक्कम घेतलेल्या कर्जाचे हप्ते रोजगार सुरू असताना वेळेत भरले गेले आहेत.
पंरतू सध्या सलग तिन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने हाताचे काम गेले आहे आणि असे असताना घर चालवणे जोखमीचे झाले असताना ह्या कंपन्या वसुली साठी जाचक अटी आणि कारवाहीच्या नावाने लोकांना नाहक व मानसिक त्रास देत आहे.त्या विरोधात त्यावर आळा बसला पाहिजे यासाठी युवक काँग्रेस नेते गणी मुल्ला यांनी संख अप्पर तहसीलदार यांना निवेदन दिले असून माइक्रो फायनान्स कंपन्याना समज देऊन त्यावर निर्बंध घालण्याची विनंती आहे.
गणी मुल्ला म्हणाले की,सध्या कोरोनाच्या जीवघेणी महामारीत जीवंत राहणे संकट बनले आहे.सर्वकाही बंद असल्याने उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले आहे.तरीही बचत गट,माइक्रो फायनान्स कंपन्याकडून हप्ते वसूलीसाठी छळ सुरू आहे, तो त्वरित थांबला पाहिजे,अन्यथा आंदोलन करू असा इशाराही मुल्ला यांनी दिला आहे.