आंवढी,संकेत टाइम्स : बागलवाडी ता.जत येथे कृषी विभागाच्या वतीने हुमणी किड नियंत्रणबाबत बांधावर मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हुमणी किड नियंत्रण सापळ्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
अधिकारी श्रीकांत नाटेकर म्हणाले,हुमणी ही एक बहुपिक वर्गीय कीड आहे.त्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे. वळिवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भूंगे जमिनीतून बाहेर पडता.त्यांचे कंडुनिंबाचे पाने खाद्य असते.नेमके या वेळेतच या हुमणीला सामुहिकपणे नष्ट करणे शक्य आहे.यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रकाश सापळा लावणे गरजेचे आहे.
प्रकाश सापळा बनविण्यासाठी ३x२ फूट लांब रुंद व अर्धा फूट खोलीचा खड्डा घ्यायचा आहे.त्यात पाणी साठुन राहावे म्हणून जाड प्लास्टिक कागद घालायचा आहे.आणि त्या खड्यात पाणी सोडायचे आहे.नंतर 50 मिली जळालेलं ऑइल टाकायचे आहे.त्या खड्याचे वर 60 किंवा 100 वॅट चा बल्प रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत चालू करायचा आहे.
हुमणीचे किडे प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात आणि ऑईलच्या पाण्यात पडून मरून जातात. अश्या प्रकारे खूप कमी पैशात घरच्या घरी आपल्या पिकावर येणाऱ्या हुमणीसारख्या महाभयानक किडीवर आपण विजय मिळवू शकतो,असे नाटेकर म्हणाले.
यावेळी कृषी सहाय्यक,महेश मळगे,कृषी सहाय्यक बालाजी ढवळे,शहाजीराव खिलारे,अशोक खिलारेव शेतकरी उपस्थित होते.
बागलवाडी ता.जत येथे हुमणी किड नियंत्रण सापळ्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.