शिक्षक बँकेने एसएमएस सेवा सुरु करावी ; बसवराज येलगार

0
0



जत,संकेत टाइम्स : पगारदार नोकराची जवळजवळ 100 टक्के वसुली असलेल्या शिक्षक बँकेची एस.एम.एस.सेवा गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे.त्यामुळे अनेक शिक्षक बांधवांची गैरसोय होत आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने अनेक चांगले निर्णय घेतले,असे त्यांचे वैक्तिक मत आहे. मग बँकेची एस.एम.एस.सेवा अनेक महिन्यापासून बंद का ? आहे,असा सवाल शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी व्यक्त केला.





सभासदकडून एसएमएस सेवा सुविधा पुरावण्यासाठी वर्षाला साठ रुपये घेतले जातात.तरीसुद्धा शिक्षक बँक ही सुविधा देत नाही,या पाठीमागचे गौड बंगाल काय आहे,याचा उमज शिक्षक सभासद बांधवाना होत नाही.संबंधिताना फोन लावून एसएमएस.सेवा अद्यावत करावी , अशी विनंती केली होती.पण सामान्य शिक्षक सभासदांची दखल सत्ताधारी संचालक घेताना दिसून येत नाही.

सभासदांचे पूर्ण कर्ज किती शिल्लक आहे. शेअर्स आणि कायम ठेव किती शिल्लक आहे याची माहिती या एसएमएस सेवेबरोबर सभासदांना देण्यात यावी,असे मत श्री.येलगार यांनी व्यक्त केले.






यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, पार्लमेन्ट्री बोर्ड नेते फत्तु नदाफ, तालुका नेते दिलीप पवार, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जकप्पा कोकरे, तालुका अध्यक्ष प्रमोद कोडग, सरचिटणीस गांधी चौगुले,संपर्क प्रमुख देवाप्पा करांडे,सुभाष शिंदे, नितीन वाघमारे, विठ्ठल कोळी, अजीम नदाफ, इत्यादी संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here