विना मास्क;जत‌ पोलीस कधी करणार ‌कारवाई

0जत : शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकावर पोलिसांकडून  दंडात्मक कारवाई 

सुरू करण्याची गरज आहे. मात्र जत‌ पोलीस ठाण्याकडून कोरोनाचे रुग्ण अजून वाढूदेत त्यानंतर कारवाई करू,असा काहीसा प्रकार जत पोलीसाकडून होत आहे.


अवैध धंद्याला बळ देणारे जतचे वरिष्ठ अधिकारी ठाण्याबाहेर पडतचं नसल्याने शहरातील नागरिक बिनधास्त फिरत आहेत.पोलीसांच्या दुर्लक्षाबरोबर नगरपरिषदेची सुस्त‌ यंत्रणा यापुर्वीही मनापासून हालली नाही,आता कोरोनाच्या लाटेत हालेल का नाही यांचा अंदाज बाधणे कठीण आहे.


Rate Card
जत शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस तर हा आकडा शंभरीपार झाला आहे. अनेक जण घराबाहेर पडताना अद्यापही काळजी घेत नाहीत. विनामास्क गाडीवर बसून अनेक जण येरझाऱ्या मारताना पोलिसांना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वाहनांची कागदपत्र तपासणीऐवजी तोंडाला मास्क आहे का, हे तपासण्याची गरज आहे. 

कधीतरी विनामास्कवर कारवाई केली जात आहे, परिणामी अनेक जण तोंडाला मास्क न लावता आढळून आले.कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व रविवारी होळी सण असतानाच राज्य सरकारने नवे निर्बंध लावले. रविवारपासून रात्री आठ ते सकाळी सात संचारबंदीची घोषणा झाली. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.