बालगांव,संकेत टाइम्स : बेंळोडगी ता.जत येथील दलित वस्ती येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण आमदार विक्रमसिंह सांवत यांचे चिंरजिव धैर्यशील सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.त्याचबरोबर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
संरपच कल्पना बुरकूले यांच्या संकल्पनेतून बेंळोडगी ग्रामपंचायती कडून गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर एटीएम बसविण्यात आले आहे. त्यांचे लोकार्पण सांवत यांनी केले.
यावेळी विक्रम फांऊडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,डॉ.सुशांत बुरकूले,अतुल मोरे,तम्माराया बोर्गीकर,धुंडेश दिवेकर,रवी बोर्गीकर,केतन नाईक,बाळू पुजारी,ग्रामसेवक सुरेश जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.
धैर्यशील सांवत म्हणाले,जगभरात सातत्याने येणारे नवे विषाणू,त्यामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातील अनेक आजार पाण्यामुळे होतात.त्यामुळे ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे. बेळोंडगी सारखा उपक्रम इतर ग्रामपंचायतीने राबवावा,असे आवाहन सांवत यांनी केले.
बेळोंडगी ता.जत येथील वॉटर एटीएमचे लोकार्पण युवक नेते धैर्यशील सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.








