जत,प्रतिनिधी : 16 जानेवारीला होणाऱ्या लसीकरणामध्ये जत तालुक्याला वगळणाऱ्या जिल्हा प्रशासनाविरोधात रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे हे ता.16/1/2021 रोजी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.
जमदाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जत तालुक्यात आरोग्य विभागातील पदे भरताना शासन,जिल्हा परिषद कायम अन्याय करत आहे.सध्या कोरोना काळातही तालुक्यात आरोग्य विभागातील 35 टक्के जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
तालुका विस्ताराने मोठा व डोगरी भागाचा आहे.तालुक्यात साडेतीन लाखावर लोकसंख्या आहे.या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी तालुक्यात 2 ग्रामीण रुग्णालये,8 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.यामध्ये सध्या विविध पदाच्या 35 टक्के जागा रिक्त आहेत.शासन जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यातील शिक्षण,आरोग्य,रस्ते,शेती व पिण्याच्या पाण्यासारखे प्रकल्प राबवितानाही अन्याय करत आहे.मार्च 2019 पासून कोरोना विषाणूमुळे तालुक्यातील जनता त्रस्त आहे.त्यांच्या आरोग्य सेवेसाठी भयानक महामारी असतानाही आरोग्य कर्मचारी अपुरे आहेत.
औषधे,वाहनाची कमतरता असतानाही तालुक्यातील प्रशासनाने रात्रन् दिवस जीव धोक्यात घालून कोरोनाला रोकण्यात यश मिळविले आहेत.बिळूर,जत शहरात कोरोनाचा प्रभाव वाढला होता.तालुक्यातील 67 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.अद्यापही तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कायम असतानाही जिल्हा प्रशासनाने अन्याय करत जत शहरातील कोविड सेंटर 1जानेवारी पासून बंद केले आहे.
एवढे कमी असतानाही कोरोना लस कोरोना लसीच्या पहिल्या टप्यात जतला वगळून अन्य 9 तालूके,सांगली,मिरज,कुपवाड महानगरपालिका हद्दीत 9 ठिकाणे,अशा 18 ठिकाणी ता.16 रोजी कोरोना लसीचे पहिल्या टप्यात लसीकरण होणार आहे. नेमके जत तालुक्यात कोरोना रोकणारे कर्मचारी नाहीत काय ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून तालुक्यावर थेट अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जमदाडे लाक्षणिक आंदोलन करणार आहेत.
जिल्हा प्रशासनाचा निषेध ; प्रकाश जमदाडे
पहिल्या टप्यात सांगली जिल्ह्यात 30 हजार लसीचे डोसचे लसीकरण होणार आहे.त्यात जिल्ह्यात 12 ठिकाणी केंद्रे करण्यात आली आहेत.यात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतानाही जतला जिल्हा प्रशासनाने वगळले आहे.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.तालुक्यात आरोग्य कर्मचारी नाहीत काय असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमच्यावरील असे अन्याय यापुढे सहन करणार नाही.
प्रकाश जमदाडे
संचालक रेल्वे बोर्ड