जतला अवकाळीचा तडाका | शेतकरी चिंतेत : द्राक्षबागाचे‌ नुकसान

0
2



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी अवकाळी पावसाचा तडाका बसला रब्बी हंगामातील प्रमुख ज्वारीसह इतर पिके भुईसपाट झाली आहेत.द्राक्ष,डाळिंब बागाचे‌ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तसेच तोडणीसाठी आलेल्या ऊस पिकाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.द्राक्ष विकण्या योग्य झालेल्या बागांना मोठा फटका बसला आहे. तर गेल्या काही दिवसापासून बिघडलेल्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने औषधाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक नुकसान होत आहे.मोठ्या कष्टाने पिकवतो. मात्र, अवकाळी पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले पीकांचे‌ नुकसान होत असल्याने शेतकरी सुन्न झाला आहे. 



अगोदरच कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अवकाळीच्या संकटामुळे द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन घटणार आहे. सरकारने पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
– सोमलिंग बोरामणी,चेअरमन,
बेळोंडगी विकास सेवा सोसायटी.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here