जत पश्चिम भागात अवैध धंदे बळावले

0डफळापूर, वार्ताहर : डफळापूरसह जत पश्चिम भागात अवैध धंदे बळावले आहेत.बेकायदा दारू अड्डे,जूगार,मटका,गांज्या,सिंदी,वाळू,चंदन तस्करी,गावागावात निर्माण झालेले गावठी दारूचे अड्डे पोलीसांच्या नाकर्तेपणाचे उदाहरणे आहेत.

डफळापूर चौकीला गेल्या अनेक दिवसापासून ठिय्या मारलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालकांशी निर्माण झालेल्या संबधामुळे तालुकाभर अवैध धंदे बंद असल्याचे छातीठोकपणे सांगणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे चित्र जत पश्चिम भागात निर्माण झाले आहे.या चौकीला नेमलेल्या कर्मचाऱ्यांना महिन्याला मलिदा पोहच होत असल्याने अवैध धंद्याला बळ मिळाले असून हप्ते द्या,काहीही करा असा अघोषित आदेशच येथील कर्मचाऱ्यांनी काढल्याने अवैध धंदे बेधडक सुरू आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांची या भागाकडे लक्ष द्यावे,अशी मागणी होत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.