लाल मातीतील शड्डू कधी घुमणार

0
3

लाल मातीतील रांगडा खेळ म्हणजे कुस्ती मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व लॉकडाऊन मुळे गेल्या आठ-नऊ महिन्यापासून  कुस्ती मैदाने बंद असून मैदानावरती अवलंबून असणाऱ्या मल्लांचा गेला सिजन पूर्णपणे वाया गेला आहे.महाराष्ट्रात अक्षय तृतीया व दत्त जयंतीपासून यात्रांचा सिजन सुरू होतो. आणि या यात्रेतील  कुस्ती  मैदानावरती पैलवान मंडळींचा आर्थिक दिनक्रम अवलंबून असतो.गेल्या नऊ महिन्यापासून बंद असलेले कुस्ती आखाडे दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाच्या नियमा नुसार पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे पैलवानांची कसरत सुरू होऊन नव्या जोमाने लाल मातीत उतरले असून शड्डूचा आवाज पुन्हा घुमू लागला आहे.



परंतु हा शड्डू कुस्ती मैदानात कधी घुमणार या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील मल्ल, वस्ताद व  कुस्ती शौकीन आहेत.  कोरोनाचा वाढता प्राधुरभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. अनेक गोष्टी बंद कराव्या लागल्या यामध्ये “महाराष्ट्रातील गावोगावी यात्रा मधून होणारी कुस्ती मैदाने 15 मार्च पासून बंद करण्यात आली.अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून  उरूस, यात्रा भरवण्यास  बंदी कायम असून.  मैदानेही  होणार नाहीत.

मैदानावरची  कुस्ती बंद असल्याने पैलवान मंडळी वरती संक्रातीची वेळ आली आहे.  महाराष्ट्रात गावोगावी होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रेला कुस्ती मैदानाशिवाय रंग चढत नाही.  अनेक यात्रामध्ये “कुस्ती” मैदानांचे आयोजन करण्यात येते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मैदाने होणार नसल्यामुळे कुस्ती वरती आवलंबून असणाऱ्या अनेक पैलवानांचा उदरनिर्वाह व खुराकाचा प्रश्न गंभीर बनला आहे.    

गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा हेच पैलवान मंडळींच्या आर्थिक उत्पनाचे सध्याचे तरी एकमेव साधन आहे. 

कुस्ती मैदानावरती कुस्ती खेळून मीळणाऱ्या बक्षिसावर्ती पैलवानांचा खुराकाचा व इतर खर्च भागतो परंतु गेल्या नऊ नाहिन्यांपासून तो थांबला आहे.शासनाच्या आदेशानुसार आठवडा बाजार, लग्न समारंभ, मेळावे, हे पुन्हा सुरळीत पार पडू लागले असून मैदानेही पूर्ववत सुरू होऊन कुस्तीला नवसंजीवनी मिळावी अशी मागणी कुस्तीगीर संघटना कडून जोर धरत आहे.

शासनाने कुस्ती आखाडे सुरू करण्यास परवानगी दिली असून पैलवान मंडळींनी पुन्हा जोमाने कसारतीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्ल कुस्ती मैदाने सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मैदाने  आयोजकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन प्रशासनाशी चर्चा करून नवीन वर्षाव कुस्ती मैदाने सुरू करावी.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here