शेगावमध्ये वाहतूक कोंडी

0



शेगाव,वार्ताहर : जत-सांगोला रस्त्याचे जतते शेगाव दरम्यानचे काम संथ गतीने सुरू आहे.सध्या पुर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी अवजड वाहतूक करणारी वाहने थेट रस्त्यावर उभी करत असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे,त्यांचा फटका सातत्याने वाहतूक ठप्प होण्यावर होत आहे.

रस्त्यावरच मोठे कंटेनर उभे केले जात आहेत.त्यामुळे दोन्ही बाजूने जाणारे वाहने एकच वाहन जाईल,इतका रस्ता उरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.एका बाजूची वाहने जाईपर्यत दुसऱ्या बाजूची वाहने थांबविण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल अर्धा,अर्धा तास कोंडी होत आहे.परिणामी वाहनधारक,प्रवाशाचा नाहक समस्येला सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर उभ्या अशा वाहनावर कारवाई करावी,तसेच महामार्गाचे काम गतीने करावे,अशी मागणी होत आहे.

Rate Card

शेगाव नजिक थेट रस्त्यावर अशी कंटेनर उभी करत असल्याने वाहतूक समस्या वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.