ट्रँक्टर दुचाकीच्या धडकेत एकजण ठार | डफळापूर नजिक अपघात ; धोकादायक ऊस पुन्हा ऐरणीवर

0
2



जत,प्रतिनिधी : धोकादायक ऊस वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच गुरूवार(ता.31) ला टँक्टरने एकाचा बळी घेतला.देवाप्पा मल्लाप्पा तेली(वय 50)यांचा ट्रक्टरचे हुक अडकल्याने दुर्दैवी मुत्यू झाला.या घटनेमुळे पुन्हा धोकादायक ऊस वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे.







जत शहराबरोबरच प्रत्येक रस्त्यांवर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, बहुसंख्य वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे ही वाहतूक जीवघेणी ठरू लागली आहे. याकडे पोलिस,तालुुुका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. गळीत हंगाम सुरू झाला की, वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर येतो. नियमांची पायमल्ली करुन सुरू असणारी वाहतूक अन्य वाहनचालकांच्या  जीवावर उठते. विशेषतः रात्रीच्यावेळी ऊस भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर बेधडकपणे उभे केला जात आहेत. यातील अनेक वाहनांना रिफ्लेक्टर बसविलेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहने दिसत नाहीत.








असाच प्रकार डफळापूर येथील प्रितम हॉटेलसमोर घडला.रात्रीच्या सुमारास जतकडे चाललेल्या ट्रक्टरला दुचाकीवरून शेतीकडे निघालेल्या देवाप्पा तेली यांना पुढील वाहनाच्या लाईटमुळे टँक्टर दिसून आला नाही.त्यामुळे ते थेट टँक्टरवर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.त्यात उपचारासाठी नेहत असताना त्यांचा वाटेत मुत्यू झाला.या घटनेची जत पोलीसात नोंद झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 



 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here