नव वर्षाच्या पहिल्या दिवशी 3 कोरोना बाधित
जत,प्रतिनिधी : जतेत नववर्षाच्या पहिल्या दिवशी 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.गेल्या चार दिवसात एकही रूग्ण आढळून न आल्याने तालुका कोरोना मुक्त होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच नव्या वर्षात नवे तीन रुग्ण आढळून आले आहे.

1 जानेवारीवाला जत 2,माडग्याळ 1 येथे नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 1963 वर पोहचली आहे.त्यातील 1866 जण कोरोना मुक्त झाले आहे.66 जणांचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे. सध्या 31 जणावर विविध रुग्णावर उपचार सुरू आहेत.