जतला विशेष निधी द्या | खा.संजय राऊत यांच्याकडे दिनकर पंतगे यांची मागणी

0
13



जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र नेते दिनकर पंतगे यांनी शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत‌ यांची भेट घेतली.जत‌ तालुक्यातील विविध ‌समस्याची माहिती पंतगे‌ यांनी राऊत‌ यांना दिली.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून जतचा शिवसेनेशी ऋुणाबंध आहे,भविष्यात जतच्या विकासासाठी विशेष लक्ष द्यावे,अशी मागणीही पंतगे यांनी खा.राऊत यांच्याकडे केली.






यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,सहकार मंत्री बाळासो पाटील,गृह राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड,खा.राऊत‌ यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.यावेळी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस कारमपुरी महाराज,शिवा ढोकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान जत तालुक्यातील प्रश्नासाठी आम्ही लक्ष घालू,असे‌ आश्वासन खा.राऊत यांनी दिले.





महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा.संजय राऊत यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here