जतेत ग्रामपंचायत निवडणुकीत 393 अर्ज दाखलआज शेवटचा दिवस ; 3 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता
जत,प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत तालुक्यात मंगळवार पर्यत एकूण 393 उमेदवारी अर्ज झाले आहे. जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुक होत आहेत.
त्यातील सिध्दनाथ,सोनलगी,तिकोंडी,या गावातील अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे या आज तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग चढत आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे आहे.आमदारांनी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले, तरी अद्याप कोणताही प्रतिसाद नागरिकांनी दिलेला नाही. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोन ऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अनेक पॅनलचे अद्याप उमेदवार ठरले नसल्याचे बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अद्यापही अर्ज दाखल झालेले नाही.सर्वाधिक 42 अर्ज उमराणी ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले आहेत.

मंगळवारी दाखल झालेले गावानुसार दाखल अर्ज अंकलगी 15,अंकले 21,
भिवर्गी 8,धावडवाडी 4,डोर्ली 15,घोलेश्वर 6,गुड्डापूर 15,गुगवाड 16,जालीहाळ खुर्द 11,कुलाळवाडी 3,लमाणतांडा उटगी 6,लमाणतांडा दरिबडची 10,मेंढिगिरी 18,मोरबगी 3,निगडी बुर्दुक 13,सनमडी/मायथळ 2,शेड्याळ 6,शेगाव 24,सिंगनहळ्ळी 12,उमराणी 21,उंटवाडी 16,उटगी 14,येळदरी 11
आजचा एकच दिवस शिल्लक
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ आजचा एकच दिवस शिल्लक
राहिला आहे.सोमवार,मंगळवारी झालेली गर्दी पाहता बुधवारी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
जत तहसील कार्यालयातील गोडावूनमध्ये मंगळवारी यात्रेचे स्वरूप आले होते.