जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दोन दिवसात नवे सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील यामुळे एकूण संख्या 1956 वर पोहचली आहे.शुक्रवारी जत 4,नवाळवाडी 1,तर शनिवारी जत 2 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात शनिवार पर्यत 1956 पैंकी 1859 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर सध्या 32 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर 65 जणाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
आजही कोरोनाचे संकट कायम आहे.त्यामुळे शासनाचे नियम काटेकोर पाळावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.