जतमध्ये पंचताराकिंत एमआयडीसी उभारू : जयंत पाटील

0
6



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ‌पाणी प्रश्न मी सोडविण्यास कठीबध्द आहे.तालुक्यातील ‌युवकांच्या हाताला मिळवून देण्यासाठी पंचताराकिंत एमआयडीसी उभारू,असे‌ प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

ते गुरूवारी जत‌ तालुक्याच्या दौऱ्यावर‌ होते.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मुलाच्या विवाह समारंभासाठी ते जतेत आले होते.विवाह सोहळ्यानंतर ना.पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर कार्यालयास भेट दिली.यावेळी ते बोलत‌ होते.









ना.पाटील पुढे म्हणाले, जत तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.तो मी सोडविणार आहे.त्याशिवाय बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी पंचताराकिंत एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन वाढवावे.युवक, अबालवृधापर्यत राष्ट्रवादीचे विचार पोहचा असे आवाहन ना.जयंत पाटील यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सूर खतीब,तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण,हेमंत खाडे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here