जत,प्रतिनिधी : संत हे आपली व परमेश्वराची भेट घडवून आणण्याचे व आपल्या जिवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून आपल्याला सन्मार्ग दाखविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आपण नेहमी संतसंगतीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन ह.भ.प.श्री. सुशांत जाधव महाराज (वडजलकर) यांनी केले आहे.
ते येथील राजे शिवाजी महाराज नगर या ठिकाणी नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री.स्वामी समर्थ मंदिराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जतचे अध्यक्ष बापू पवार यांनी आपली स्व:ताची साडेपाच गुंठे जागा श्री.स्वामी समर्थ मंदिरासाठी दिली आहे. याच जागेवर येथिल अभियंता विश्र्वनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र अभियंता कपिल शिंदे यांच्या कल्पनेतून एका सुंदर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
त्याचे उद्घाटन आज ह.भ.प.श्री.सुशांत महाराज वडजलकर यांच्या शुभ हस्ते व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन ट्रष्टचे अध्यक्ष श्री.पवार, उपाध्यक्ष टअशोक तेली, श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, नारायण पवार,मोहन पवार,शंकर वाघमोडे, सदाशिव जाधव (तात्या)
आदिनी केले होते.
जत येथील श्री.स्वामी समर्थ मंदिराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन मान्यवर