डफळापूरात विषारी औषध पिऊन आत्महत्या
जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथे विवाहिताने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.महादेवी बसप्पा हारूगिरे (वय 30,सध्या रा.डफळापूर)असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,
मुळ हारूगिरे क्रॉस(कर्नाटक)येथील असणारे बसाप्पा हारूगिरे यांनी सुमारे आठ वर्षापुर्वी डफळापूर खलाटी सिमेजवळ जमिन घेतली होती.

तेथे बसाप्पा,पत्नी मुलासह राहत होते.शुक्रवारी मध्यरात्री पत्नी महादेवी यांनी कोणतेतरी औषध पिले,सकाळी सर्वजण उठल्यावर हा प्रकार समोर आला.महादेवी यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी आणण्यात आले.मात्र तत्पुर्वी त्यांचा मुत्यू झाला होता.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.घटनेची फिर्याद ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर इरकर यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.