धक्कादायक | घुणे धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मुलीचा बुडून मुत्यू

0
3



मंगळवेढा : तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई व दोन मुलींचा पाय घसरुन बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी तळसंगी (ता.मंगळवेढा) येथे घटना घडली. रेश्मा बगताज शेख (वय.35), सुफीया बगताज शेख (वय.11), खुशबू बगताज शेख (वय.9) असे बुडालेल्या आई व मुलीची नावे आहेत.










घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,तळसंगीच्या गावाजवळ असणाऱ्या तलावात रेश्मा बगताज शेख  या त्यांच्या दोन मुली सुफीया व खुशबू यांच्यासह धुणे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या.धुणे धूत असताना रेश्मा शेख यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्या बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी मुली सुफीया व खुशबू यांनी प्रयत्न केला मात्र त्यांनाही पोहचा‌ येत नसल्याने तिघींचाही बुडून मुत्यू झाला.गावात दुसरी दुदैवी घटना घडली आहे. 









यापुर्वी दोन महिन्यांपूर्वी तीन लहान मुलांचा एका शेततळ्यामध्ये पडून  बुडून मृत्यू झाला आहे.त्यांनतर पुन्हा बुडून मायलेकीचा मुत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तलाव व शेत‌ तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.







Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here