जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात जिल्हा बँकेत खाते असलेल्या महिलांना
केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांना अद्याप महिना 500 रूपयेचा निधी मिळालेला नाही.इतर राष्ट्रीयकृत बँकात असे पैसे जमा झाले आहेत.मात्र सांगली
जिल्हा बँकेत खाते असणाऱ्या महिलांना अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.ते बँकेचे व्यवस्थापनाच्या चुकीमुळे जमा झाले नाही.तातडीने ते पैसे जमा करावेत,अशी मागणी बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी केली आहे.
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यात 500 रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत तीन महिने ही रक्कम जमा करण्यात आली आहे.जत तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत्त बँकात खाते असलेल्या महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत.
मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जनधन असणाऱ्या खात्यावर अद्याप पर्यत पैसे जमा झालेले नाहीत. राज्यभरातील अनेक सहकारी बँकेत पैसे जमा झाले असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत हे पैसे जमा न झाल्याने महिला नाराज आहेत.बँकेने तात्काळ प्रशासकीय कारवाई पुर्ण करून हे पैसे खात्यावर जमा करावे,अशी मागणी बोरामणी यांनी केली आहे.यासंदर्भात मी लाभार्थी महिलासह जिल्हाधिकारी यांनाही भेटणार असल्याचेही बोरामणी यांनी सांगितले.