जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पेयजल योजनेच्या 37 गावांच्या योजनेसंदर्भात मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी सुनावणी घेतली.यात रामपूर-मल्लाळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अचकनहळळी येथील ग्रामसेवकाची तीन वेतन वाढ बंद करण्याचे व 31 मार्च अखेर जे योजनांची कामे पूर्ण करणार नाहीत,त्या ग्रामपंचायतींकडून सर्व खर्च वसूल करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदेश यांनी दिले.
जत तालुक्यातील 2018 पासून आतापर्यत 48 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल व महाजल या योजना रखडल्या आहेत.यासंदर्भात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुंबईत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती.या योजनांच्या चौकशी लावण्यात आल्या होत्या.त्यानंतर आता प्रत्यक्षात कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे.
त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी,अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकात गुड्डेवार यांच्या उपस्थितीत योजनाच्या अधिकारी,ठेकेदार,पाणी समितीचे पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली.48 पैकी 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्याने 34 ग्रामपंचायतीच्या 37 पाणी योजना यांवर सुनावणी घेण्यात आली.
रामपूर मल्याळ योजनेचे अध्यक्ष व सचिव यांना योजनेचे दप्तर हस्तांतरण करणेबाबत सुचना देवूनही त्यांनी
कोणतीच कार्यवाही न केलेने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणेचे आदेश दिले.
अचकनहळळी येथील ग्रामसेवक डी.बी.चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या तीन वेतनवाढी तर
आवंढी योजनेचाअहवाल देणेमध्ये कनिष्ठ अभियंता ए.बी.चव्हाण यांनी कुचराई केलेने त्यांच्या 2 वेतनवाढी बंद करण्याचे आदेश यावेळी देणेत आले.अपुर्ण योजनांचा आढावा घेवून प्रत्येक योजनेस विहीत मुदतीत देणेतआली आहे. त्यामध्ये कार्यवाही न झालेस
संबंधितअध्यक्ष,सचिव,सरपंच,ग्रामसेवक तांत्रिक सेवा पुरवठादार व मक्तेदार व यास जबाबदार असणा-यांवर
योजना विलंबाबाबत फौजदारी गुन्हा दाखल करुन, योजनेवर झालेला खर्चाच्या रकमेचा बोजा त्यांचे 7/12 व
प्रॉपर्टीवर चढविणेत येणार आहे.
ज्या ग्रामपंचायतींचे सरपंच, अध्यक्ष सचिव बैठकीस अनुपस्थित होते.त्या गावांची विशेष तपासणी घेणेत येणार आहे.मंगळवारी सकाळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डफळापूर योजनेस,सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुंभारी योजनेच्या
उंच टाकीस व त्या जवळील वस्तीस भेट देवून पाणी पुरवठा होत आहे का ?
याबाबतची खातरजमा केली. तसेच
नागरिकांना पाणी मुबलक मिळते का याबाबत विचारणा केली.ज्या योजना वीज कनेक्शन अभावी रखडलेल्या आहेत, याबाबत संबंधित महावितरणचे अधिकारी यांना बैठकीमध्ये समक्ष बोलावून वीज कनेक्शन तात्काळ देणेच्या सुचना करणेत आल्या.यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,कार्यकारी अभियंता डी.जे.सोनावणे,उप अभियंता उदय देशपांडे उपस्थित होते.