जत,प्रतिनिधी : जत शहरातील नागरिक संसर्गजन्य आजाराने हैराण झाले आहेत. रात्री अपरात्री अचानक ताप येणे,उलट्या, सांधे दुकणे आदी आजार बळावंत आहेत.अशा आजाराने शहरातील खाजगी दवाखान्यात रुग्णाची संख्या वाढली आहे.शहरातील वाढलेली अस्वच्छता,डांसाचे वाढलेले प्रमाण,अशुध्द पाणी पुरवठा या कारणामुळे शहरात अशा व्हायरल इन्फेक्शन आजाराचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टराचे म्हणणे आहे.याबाबत नगरपरिषद प्रशासन अनभिज्ञ दिसत आहेत.त्याच्या कडून अद्याप उपाययोजना सुरू नसल्याचे चित्र आहे.
शहरातील आंबेडकर नगर,स्टिल कॉलनी,बाजार पेठ,सिध्दार्थ कॉलनी,विठ्ठल वाडी आदी भागात सर्वाधिक रुग्ण आहेत.शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जत शहरातील ग्रामीण रुग्णालयात व्यवस्थित उपचार होत नसल्याने खाजगी दवाखान्यात रुग्ण वाढले आहेत.शहरातह स्वच्छतेचे तिन तेरा आहे.शहरातील गंधर्व नदी,छोटे,मोठे नाले अनेक वर्षापासून घाणीने तुंबले आहे.अनेक वर्षापासून तुंबलेल्या नाल्यातून रोगाची उत्पत्ती होत आहे.अनेक गल्लीतील पाणी पुरवठा पाईपलाईन मधुन अशुध्द पाणी पुरवठा होत आहे.पिण्यासाठी सोडलेले पाणी निर्रजंतूकरण केले जात नसल्याने धोका वाढला आहे.दरम्यान शहरात वाढत्या संसर्गजन्य आजाराने सामान्य जनतेबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधीही या आजाराचे बळी पडले आहेत.
दरम्यान जत शहरातील तुंबलेल्या गटारी,नाल्यातील घाण व अशुध्द पाणी पुरवठ्यामुळे नारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जत नगरपरिषद होऊनही स्वच्छतेबाबतचे उदाशिन धोरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे.तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.