जत तालुक्यात सोमवारी दोन रुग्ण
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सोमवारी दोन रूग्ण व शुन्य मृत्यू असे दिलासादायक चित्र पाहवयास मिळाले आहे.तर शहरात सलग दहाव्या दिवशी ही रूग्ण संख्या एकेरी आकड्यात असून पाचच्या आत पाहवयास मिळाली आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत 218 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1938 झाली आहे. सोमवारी तालुक्यातील 116 गावापैकी दोन गावात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले.
जतशहर 1,कोतेंबोबलाद 1, येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.गेल्या पंधरवड्यात एकाही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही.*