जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बेकायदा वाळू तस्कर रोकण्यासाठी जत अप्पर तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी एकीकडे रात्रीचा दिवस करत असताना काही महारथी पकडलेल्या वाळूची वाहने सोडविण्यासाठी अप्पर तहसीलदार यांच्यावर दबाब टाकत असल्याची चर्चा आहे.
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू तस्करी सुरू आहे. जत तहसील कार्यालयातील अधिकारीच त्यात सामील असल्याने कारवाई शुन्य आहे.तर नेत्याच्या बरोबर फिरणारे काही फंटर थेट तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाब टाकत असल्याचे समोर येत आहे.
संख अप्पर तहसील कार्यालयकडून रात्रभर कारवाई करून अवैध वाळू तस्करी करताना पकडलेली वाहने कारवाई न करता सोडवेत म्हणून जतहून गेलेले काही फंटर राजकीय नेत्याचा आधार घेत दबाब टाकत असल्याची चर्चा आहे. काही तोंडे बघून वाळू तस्करी करणारी वाहने कारवाई न करताच सोडून दिल्याचेही समोर येत आहे.