जत,प्रतिनिधी : जमिनीच्या खरेदीनंतर नोंदीसाठी लाभार्थ्याकडून जत तालुक्यातील तलाठी,सर्कलकडून मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी करण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.लाच न देणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना विविध तक्रारी,समस्या दाखवून नोंदीसाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक जमिनीच्या नोंदी वर्षे होऊनही होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
तालुक्यात मुळात लुटीचा प्रकार नवा नाही मात्र आता जमिन नोंदीसाठी हाजाराचा आकडा लाखापर्यत पोहचला आहे.तालुक्यात तलाठी,सर्कलाचा लुटीचे अड्डे भहरले असून तालुक्यातील अनेक सर्कल,तलाठी थेट नोंदीसाठी वीस हजार ते लाखापर्यत मागणी करत आहेत.पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी अडकविल्या जात आहेत.
त्याला कायद्याची भिंती दाखविली जात आहे.शेतकऱ्यांची थेट लुट करणाऱ्या तलाठी,सर्कलांना जतच्या वरिष्ठ कार्यालयातून रसद मिळत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील एका सर्कलची मोठी समिती नेमून चौकशी होऊनही वरिष्ठ कार्यालयात त्यांचा वावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारभार स्पष्ट करत आहे.