जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथील एचपी गँस एजन्सी येथील चोरी प्रकरणी शिवाजी पल्हाद चव्हाण (रा.उमराणी रोड,पांरघी तांडा जत) या संशयित आरोपीस जत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
बिळूर येथील श्रीशैल पाटील यांच्या मालकीचे एचपी गँस एजन्सीचे कार्यालय 30 नोंव्होबरला फोडून 26,250 रूपयाच्या 2 बर्नरच्या 21 शेगड्या,600 रूपयाच्या रेग्युलेटरच्या पाईप,5000 रूपयाचे सीसीटिव्ही कँमेऱ्यांचा डिव्हीआर,रोख 4000 असा 37,850 रूपयाचा मुद्देमाल लंपास केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता.त्यात संशयावरून शिवाजी चव्हाण याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडे कसून तपास सुरू असल्याचे पोलीस निरिक्षक उत्तम जाधव यांनी सांगितले.