कालबाह्य वसाहतीत कर्मचाऱ्यांचे वास्तव | जत,उमदीची पोलीस वसाहतीची आवस्था ; कोले फुटली,भिंतीला तडे

0जत,प्रतिनिधी : जत पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलिस वसाहत मोडकळीस आली असून काही खोल्या वगळता इमारतीचे छत,भिंती कोसळण्याचे स्थितीत आहे.वापरात असलेल्या काही खोल्याच अनेकदा सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव सातत्याने आढळून येत आहे.पर्याय नसल्याने कालबाह्य वसाहतीत काही कर्मचारी वास्तव करत आहेत.यामुळे पोलीसांच्या घरासह सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे.सण, उत्सव, घरगुती समारंभ अशा सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून पोलिस कर्मचारी जनतेच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सेवा देत असतात. मात्र पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचे मात्र कुणालाच काही देणेघेणे नसल्याचा उत्तम नमुना म्हणजे जत पोलीस ठाण्याच्या शेजारी असणारी पोलीस वसाहत आहे.


महाराष्ट्रामध्ये सरकारे बदलली, अनेक गृहमंत्री बदलले परंतु पोलिसांच्या जगण्याचे वास्तव बदलण्यासाठी कुणी आत्मियतेने प्रयत्न केल्याचे दिसत नाही.2004 पासून आर.आर.पाटील यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाची सूत्रे आपल्या हातात घेत पोलिसांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीकोनातून काही घोषणा केल्या होत्या, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर फारसे काही होऊ शकले नाही.त्यामुळे पोलिसांच्या घरांचा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत आहे.मुळात पोलिसांची ही घरे खुराड्या सारखी बनली आहेत. इमारती कालबाह्य झाल्या आहेत.भिंतीला तडे पडले आहेत. 


फुटलेली कवले,भिंतीला पावसाळ्यात गळती लागते.कमी जागेत असलेल्या खोल्यामुळे उन्हाळ्यात उकाड्याने हैराण होते.विजेचे फिटिंगही अनेक ठिकाणी इतके तकलादू झाले आहे.यांचा फटका नेहमी शॉक लागण्याचा धोका बळावला.

इमारती या कवलारू असल्याने पावसाळ्यात गळक्या इमारतीमुळे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलीसदादाची मोठी तारांबळ उडत आहे.


खरेतर पोलिसांच्या घरांच्या प्रश्नांबाबत सरकारी पातळीवरून दाखवली जाणारी उदासीनता गुन्हेगारी स्वरुपाची आहे. जतमध्ये असणाऱ्या पोलिस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जत पोलिस ठाण्यात सध्या 4 अधिकारी,तर 69 कर्मचारी आहेत.सध्या यातील दोन-चार खोल्या पोलीसांना पुरेल ऐवढ्या खोल्या सुस्थितीत आहेत.

पोलीसाच्या दोन ठिकाणच्या वसाहतींमध्ये 47 खोल्या असून त्यापैंकी 45 खोल्या राहण्यास योग्य नसल्यामुळे पडून आहेत.पर्याय नसल्याने काही कर्मचारी त्यातील काही प्रमाणात चांगल्या असलेल्या खोल्यात धोका पत्करून राहत आहेत.

Rate Card

घरांची चिंता पोलिसांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करत आहे.नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास, कामाचे जादा तास, कर्मचारी भरती नसल्याने सुट्ट्यांची वानवा याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही झाला आहे. 

उमदीत अशीच स्थिती


उमदी पोलीस ठाण्यालगतच्या पोलीस वसाहतीतील खोल्या मोडकळीस आल्या आहेत.निकृष्ठ कामाचा फटका या खोल्यांना बसला आहे.मुदतीअगोदरचं खोल्याची कौले,भिंतीला तडे गेले आहेत.सरपडणाऱ्या प्राण्याचा वावर येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारा आहे.
नवीन वसाहतीसाठी पाठपुरावा करू ; आमदार विक्रमसिंह सावंत


जत व उमदी पोलीस ठाण्याच्या वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या खोल्या व अधिकाऱ्यांचे बंगले अनेक वर्षापुर्वी बांधलेले असल्याने ते कालबाह्य झाले आहेत.त्यांची माहिती आम्ही गोळा केली असून दोन्ही ठाण्यासाठी स्वतंत्र नव्या पध्दतीची कर्मचारी वसाहत,अधिकाऱ्यांचे बंगले बांधण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन याबाबत वस्तूस्थिती मांडणार आहे.


आ.विक्रमसिंह सांवतजत पोलीस ठाण्यातील कर्मचारी वसाहतीचे जीर्ण इमारत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.