जत,प्रतिनिधी : अनेकवेळा मागणीनंतर अखेर जत-डफळापूर रस्त्याचे खड्डे करण्याचे काम सुरू झाले आहे.मात्र दगडे टाकून त्यात डांबराचा फवारा मारून भरत निकृष्टपणे भरलेले खड्डे किती दिवस टिकणार याबाबत सांशकता आहे.
जत-सांगलीला जाणाऱ्या जत-कवटेमहाकांळ हा रस्ता आता महामार्ग प्राधिकरणाकडे गेला आहे.त्यामुळे त्यांच्या कडून रस्त्यावरील खड्डे भरून डांबरीकरण करण्याचे काम दोन महिन्यापुर्वीच्या पाऊस सुरू असताना सुरू होते.पावसाने अनेक दिवस ठिया मांडल्यामुळे काम थांबविण्यात आले होते.आता नव्याने झालेले कामही अनेक ठिकाणी उखडले आहे.
ठेकेदाराकडून उर्वरित काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.निकृष्ट कामाचा कळस पुन्हा रस्त्यावरील खड्डे भरताना होत आहे. पुन्हा डांबरी करण्याचे लिपटिक लावून रस्ता करण्यात येणार आहे. मात्र नेमके काम कुठेपर्यत होणार याबाबत स्पष्टता नसल्याने खड्डे पाट सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.प्राधिकरण विभागाचे अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने चांगले काम करा म्हणून सांगणारे कोणच नसल्याने ठेकेदाराचे कर्मचारी मनाला वाटेल तसे काम करत आहेत.
जत-डफळापूर रस्त्यावरील खड्डे भरण्यात येत आहेत