श्रीसंत शिवलिंगव्वांचे जतमधील जंगममठ भक्तीचे केंद्र ; मरुळशंकर स्वामीजी

0जत,प्रतिनिधी: साधनाभ्यासाने श्रीसंत शिवलिंगव्वांनी अध्यात्मिक क्षेत्रात फार मोठे स्थान प्राप्त करून घेतले होते.त्यांचे घर म्हणजेच जतमधील जंगममठ भक्तीचे केंद्र बनले होते.रामदासस्वामींच्या दासबोध,ज्ञानेश्वरी या ग्रंथावर त्या प्रवचन करत असत.प्रपंच व परमार्थात आपले आचरण कसें असावे याबाबत त्या मौलिक मार्गदर्शन करीत.नामस्मरण केल्याने मनातील काम,क्रोध,लोभ,मद, मोह,मत्सर आपोआप निघून जाऊन प्रपंच व जीवन सुखमय होतें असा त्यांचा संदेश आपण अमलात आणूया आपले जीवन आनंदी बनवू या.जीवन आनंदी होण्यासाठी अध्यात्माची वाट धरू या अशी भावना शिवानुभव मंडप संस्थेचे श्री.मरुळशंकर स्वामीजी यांनी व्यक्त केली.

जत येथील थोर तपस्वी संत श्री शिवलिंगव्वा यांच्या 90 वा पुण्यतिथी सोहळ्या निमित्त स्वामीजी बोलत होते.  मंगळवार दि.1 डिसेंबरला ‘श्री’वर पुष्पांजली सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत दि.25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असा सात दिवस हा सोहळा संपन्न झाला.यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मठाच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी सप्ताह सोहळा मठाचे मठाधिपती आण्णया स्वामी,महादेव स्वामी व श्री संत शिवलिंगव्वा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो.दररोज सायंकाळी कन्नूरच्या  गणपतराव महाराज सद्गुरु सेवा मंडळ जतच्यावतीने भजन व आरतीचा कार्यक्रम सादर करण्यात आला.तर दासबोध वाचन व प्रवचन बी.के.कुलकर्णी यांनी केले.बेळगाव येथील गुरुदेव रानडे महाराज मठ या ठिकाणी तर मल्लिकार्जुन उपर,(सिंदगी)सुमित्रा बापट(सांगली), रावसाहेब शिंदे(पुणे) यांच्यासह अनेक साधकांनी शिवलिंगव्वांची पुण्यतिथी घरी साजरी केली.


Rate Card


यावेळी प्रा.नारायण केशव आपटे यांनी संपादीत केलेल्या संजीवनी लहरी या त्रैमासिक विशेषांकातील भारतीय स्त्री संत या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.पुण्यतिथी सोहळ्याला कन्नूर मठाचे मठाधिपती शिवानंद हिरेमठ,विरेश हिरेमठ,डॉ.रवींद्र आरळी, डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी,डॉ.मल्लिकार्जुन काळगी,डॉ.सौ.सरिता पट्टणशेट्टी,शिवलिंगापा संख,प्रा.सुधीर चव्हाण,बाबुराव पट्टणशेट्टी व परिवार,शरणापा आक्की,शिवकुमार दुगानी,उमेश अंगडी,अँड.श्रीपाद अष्टेकर, शिवकुमार ऐनापुरे,युवानेते योगेश मोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


जत : प्रा.नारायण केशव आपटे यांनी संपादीत केलेल्या संजीवनी लहरी या त्रैमासिक विशेषांकातील भारतीय स्त्री संत या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.