जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेने सन 2012 पासूनचा प्रलंबित दिव्यांग कल्याण निधी खर्च खर्च करावा या मागणीसाठी जत तालुक्यातील दिव्यांग जागतिक अपंग दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती विक्रम ढोणे यांनी दिली.
जत नगरपरिषदेने शासन निर्णय क्र संकीर्ण 2007/प्र क्र 4871 वित्त 3 दिनांक 5 ऑक्टो 2012 चे परिपत्रक 3 टक्के दिव्यांग कल्याण निधी व दि 25 जून 2018 चे सुधारित 5 टक्केच्या परिपत्रकात
प्रमाणे दिव्यांग कल्याण निधी वाटप न झाल्याने प्रलंबित आहे तो वाटप करावा यासाठी जत नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
ऐन दिवाळीत नगरपरिषद कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी खर्डा भाकरी खाऊन शिमगा आंदोलन केले तरी सुद्धा नगरपरिषद प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नाही त्यामुळे जत तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंगदिनी धरणे आंदोलन करून या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी व प्रलंबित दिव्यांग निधी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जत नगरपरिषद प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करत असल्याची माहिती विक्रम ढोणे यांनी दिली.