पदवीधर व शिक्षकसाठी चुरसीने मतदान | जतेत पदवीधर 70 ; शिक्षकसाठी 87 टक्के मतदान

0जत,प्रतिनिधी  : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज (दि.1 ) मतदान झाले आहे.या निवडणूकीसाठी जत तालुक्यात पदवीधर 70.28 तर शिक्षकसाठी 87 टक्के मतदान झाले आहेत.तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळपासून कॉग्रेस,राष्ट्रवादी,भाजपा,व विविध संघटनाच्या नेत्यांची उपस्थिती होती.प्रथमच ही निवडणूक राजकीय झाली आहे.जत तालुक्यातील राजकीय नेत्यांनी सहभाग  घेतल्याने मतदानाचा आकडा काहीसा वाढल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील पदवीधर मतदार संघासाठी सात मतदान केंद्रात पुरुष पदवीधर मतदार 2213,

स्त्री पदवीधर मतदार 498 असे एकूण 2712  मतदार होते.त्यापैंकी पुरुष 1600,स्त्री 306 असे एकूण 1906 मतदान झाले आहे. एकूण मतदान टक्केवारी 70.28 आहे.

शिक्षक मतदार संघासाठी एकूण 6 मतदान केंद्रात 

पुरुष शिक्षक मतदार 650,स्त्री शिक्षक मतदार  104 असे एकूण 754 शिक्षक मतदारापैंकी  पुरुष 570,स्त्री 86

असे एकूण  656 मतदान टक्केवारी 87 झाली आहे.


Rate Card

तालुक्यात प्रथम यंदा राजकीय पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.कॉग्रेस,राष्ट्रवादी,भाजपचे पहिल्या फळीसह दुसऱ्या फळीचे नेते मतदान केंद्रावर मतदान करून घेताना दिसले.त्याशिवाय उमेदवारांचे प्रतिनिधीही क्रेंदाबाहेर ठाण मांडून होते.

पुणे पदवीधर साठी भाजपकडून संग्रामसिंग देशमुख महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड व मनसेकडून रूपाली पाटील -ठोंबरे यांच्या चुरशीची लढत होत आहे.


जवळपास गेले पंधरा दिवसांपासून या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी एकमेकांवर झाडल्या जात होत्या. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 

कोरोनानंतर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ न देताच राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात कोरोनाचे संकट यामुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली होती.

पुणे विभागातील पाचही जिल्हा हा निवडणुकीचे कार्यक्षेत्र असून, विभागात पदवीधर आणि शिक्षक सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आगोदर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. यामध्ये या शेवटच्या दिवसात अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार मतदार यादी घेण्यात आली आहेत. Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.