जत,प्रतिनिधी : बेंळोडगी परिसरातील शेतकरा सातत्याने निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत.एकीकडे शेतकरी अडचणीत असतानाही,अवकाळी,पिकविमा,दुष्का
संयमाचा अंत पाहू नका,असा इशारा बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी दिला आहे.
गत वर्षात तीनवेळा अवकाळी,अतिवृष्ठीमुळे या परिसरातील द्राक्ष,डाळिंब,तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तीन्हीही वेळी प्रशासनाकडून पंचनाम्याचे सोपस्कर उरकण्यात आले आहे. मात्र एकाही वेळची भरपाई आम्हाला मिळालेली नाही.त्याशिवाय पिकविमा भरूनही लाभ मिळत नाही.आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत काय,प्रत्येक वेळी प्रशासनाकडून आम्हाला डावलण्यात येत आहे.
सत्तेत असणारे पदाधिकारीही निवडणूक आली की,आश्वासनाचा पाऊस पाडतात. निवडणूक झाली गायब होतात.ते दुसऱ्या निवडणूकीत दिसतात.कबाडकष्ठ करूनही हाल सुरू आहेत.आताही गेल्या चार दिवसात बिघडलेल्या वातावरणाचा फटका आम्हा शेतकऱ्यांना बसला आहे.आमच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने मदत द्यावी,असेही बोरामणी म्हटले आहे.