आष्टा : आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील मिरजवाडी परिसरात बेकायदा गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी फारूख आप्पालाल संदे,वय 20,रा.गणेशनगर नागठाणे ता.पलूस याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
पुणे शिक्षक व पुणे मतदार संघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदासुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने अवैध शस्ञे बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याचे आदेशवरून जिल्हाभर तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी आष्टा मिरजवाडी रस्त्यावर फारूख संदे गावठी कट्टा कंबरेला लावून थांबल्याची माहिती मिळाली होती.त्याआधारे त्याला ताब्यात घेतले असता,त्यांच्याकडे एक काळ्या गावठी कट्टा,एक जिंवत काडतूस असा 20,500 रूपयाचा मुद्देमाल मिळून आला.