जत,प्रतिनिधी : दरिबडची ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी अमोगसिध्द बिराप्पा शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली.
गेल्या तीन वर्षापुर्वी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली पँनेलप्रमुख पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाधर मोरडी,माजी ग्रा.पं.सदस्य भिमराव माळी यांच्या नेतृत्वाखाली दरिबडची ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली होती.
पहिल्या लोकनियुक्त संरपच सौ.सुमित्रा मोरडी यांच्यासह पँनेलचा विजय झाला होता.मावळते उपसंरपच रमेश मासाळ यांची मुदत पुर्ण संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.या रिक्त जागेवर अमोगसिध्द शेंडगे यांनी संधी देण्यात आली आहे.
जत तालुक्यात प्रथमच उपसंरपच अमोगसिध्द शेंडगे व छाया अमोगसिध्द शेंडगे हे पती-पत्नी ग्रामपंचायतीत निवडून आले होते.
यावेळी नुतन उपसंरपच अमोगसिध्द शेंडगे यांचा पँनेलप्रमुख,गंगाधर मोरडी,भिमराव माळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
निवडीनंतर बोलताना अमोगसिध्द शेंडगे म्हणाले,माझी उपसंरपचपदी निवड करून पँनेलप्रमुखांनी माझ्या दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू.गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याला माझे प्राधान्य राहिल.आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या माध्यमातून गावात विविध विकास योजना राबवून निवडणूकीपुर्व दिलेली आश्वासने पुर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील,असेही शेंडगे म्हणाले.
यावेळी सर्व ग्रा.पं.सदस्य,ग्रामसेवक,पँने
दरिबडची ता.जत येथील उपसंरपचपदी अमोगसिध्द शेंडगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.