संग्राम देशमुख यांचा विजय निश्चित ; विलासराव जगताप

0
7





माडग्याळ,वार्ताहर : पुणे पदवीधर मतदार संघातील भाजप व मित्रपक्षाचे‌ उमेदवार संग्राम संपतराव ‌देशमुख यांच्या प्रचारास माडग्याळ ता.जत येथे सुरूवात करण्यात आली.

पदवीधराच्या न्यायहक्कासाठी संग्राम देशमुख यांना विजयी करा असे आवाहन यावेळी,माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.जत‌ तालुक्यात यावेळी सर्वाधिक पदवीधर मतदारांची नोंद झाली आहे.









त्यामुळे पदवीधरांनी दक्ष होऊन भाजपचे हात‌ बळकट करावेत.आमचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या नावापुढे पसंती क्रमांक 1 लिहून प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहनही जगताप यांनी केले.









जत तालुक्यातील प्रचार माजी आमदार जगताप व माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने प्रचार सुरू आहे.माडग्याळसह पुर्व भागामध्ये जि.प.सदस्या सौ.आश्विनीताई पाटील,पंचायत समिती सभापती सौ.सिमाताई प्रकाश मांगलेकर,सौ.मंगलताई क्षिरसागर महिला अध्यक्षा सौ.पपिताताई सुतार,सौ.विद्याताई पवार,शिवणीच्या संरपच सौ.शुभांगीताई पवार,युवा नेते कामाण्णा बंडगर, माडग्याळ यांनी नियोजनाने प्रचाराची सुरवात केली आहे.










सर्वत्र मोठा प्रतिसाद‌ असून आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,असे माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांनी सांगितले.



माडग्याळ : पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारास सुरूवात करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here