संख,वार्ताहर : जत तालुक्यातील भिवर्गी येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून बोर नदीत वाळू तस्कार करणारे दोन ट्रँक्टर,एक जेसीबी पकडला आहे.यावर्षातील सर्वात मोठी कार्यवाही आहे.जप्त करुन संख अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.तर करजगी हद्दीतील वाळूचा ट्रँक्टर पथकाची माहिती मिळाल्याने पलायन केला आहे. ही कार्यवाही शुक्रवारी रात्री
2.30 वाजता करण्यात आली आहे.
पूर्व भागात बोर नदी 56 कि.मी अंतर आहे.तत्कालीन अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी धडक मोहीम राबवून तस्करीला मोठा चाफ लावला होता.तस्करावर कोट्यवधी रुपयांचा दंड,शेत जमिनीवर बोजा चढविण्यात आला आहे.त्यांची आँक्टोबर महिन्यात त्यांंची बदली झाली आहे.बदली झाल्यावर महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात सुरु झाली होती.
अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या दिवाळी सुट्टीचा फायदा घेऊन तस्करीना मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु केला होता.प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली,संख अप्पर तहसिलदार कार्यालयाचे अप्पर तहसिलदार हणमंत मेत्रे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री 2.30 वाजता नदी पत्रातील भिवर्गी,खंडनाळ,करजगी हद्दीत येथे धाडी टाकल्या आहेत.
भिवर्गी येथे संख मध्यम प्रकल्पा जवळ वाळूने भरलेला,वाळू भरत असताना कर्नाटक पासिंगचा के.ए.23 .टी बी 4818 ट्रँक्टर,व एम.एच 13 ए.एच 0383 जेसीबी.व बिगर नंबरचा टंँक्टर आढळून आला.महसूल विभागाच्या पथकाने ट्रँक्टर,वाळू जप्त करुन अप्पर तहसिलदार कार्यालयात लावला आहे.करजगी हद्दीत वाळू तस्करांना पथक आल्याची माहिती मिळताच ट्रँक्टर पथकाच्या हतावर तुरी देत अगोदरच पलायन केले आहे.
” ट्रँक्टर,जेसीबी व बिगर नंबर असलेल्या ट्रँक्टर मालकाना नोटीस दिली जाणार आहे.त्याच्यावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे.तसेच यापुढेही वाळू तस्करीविरोधात कडक मोहिम राबवून वाळू तस्करीला चाफ लावणार आहे.”अशी माहिती अप्पर तहसिलदार हणमंत मेत्रे यांनी दिली आहे.
संख अप्पर तहसीलच्या पथकाने पकडलेला जेसीबी व ट्रक्टर