जत,प्रतिनिधी : जतेत सध्या कोविड रुग्णांची संख्या सर्वत्र कमी होताना दिसत असली तरीही जागितक स्तरावरील कोविड उद्रेकाचे अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशामध्ये कोविड आजाराची दुसरी लाट आली आहे. या उदाहरणावरुन आपल्याकडे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि नगरपालिकेने आपापल्या कार्यक्षेत्रात यंत्रणा वाढवत सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यानुसार प्रयोग शाळा तपासणी संदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. सध्या सगळीकडे दिवाळीची धामधुम आहे. मात्र दिवाळी साजरी करताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. यासाठीची दक्षता आता सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. खुद्द आरेाग्य विभागानेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली असून प्रशासनाला पूर्व तयारी करण्या बाबत निर्देश दिले आहेत. संकट येण्या आगोदरच आपली पूर्ण तयारी असली पाहिजे त्यासाठी फ्ल्यू सदृ्श्य रुग्णांचे सर्वेक्षण नियमित करण्यास सांगण्यात आले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात फिवर क्लिनीक या सर्वेक्षणात महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे अधिक प्रमाणात फ्ल्यू सारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोग शाळा, चाचण्यांचे प्रमाण आवश्यकतेनूसार वाढवावे, गृह भेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने व युद्धपातळीवर सुरु करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य लाट थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे.