दिवाळी‌चे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

0
2



जत,प्रतिनिधी : कोरोनातून सावरलेल्या नागरिकांच्या प्रतिसादामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. त्याबरोबर अनेकजण ऑनलाइन शॉपिंगचाही पर्याय स्वीकारत आहेत.दिवाळीमुळे विविध कंपन्यांनी सवलती जाहीर केल्या आहेत. स्थानिक बाजारपेठेतील दुकानांच्या तुलनेत ऑनलाईनवर स्वस्त आणि मस्त वस्तू असल्याने ही खरेदी फायदेशीर असल्याचे तरुण सांगत आहेत.







ऑनलाईन खरेदी करताना आधीच्या ग्राहकांनी त्या वस्तूबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे पाहता येते. बुक केलेली वस्तू कोठे आहे, ती घरी कधी येणार, हे पाहता येते. दुकानात जाऊन मोबाईल खरेदी केला तर त्यासाठी जास्त किंमत द्यावी लागते. परंतु ऑनलाईन खरेदी केला तर पैसे वाचतात. हवी असलेली वस्तू घरपोच मिळते,असे तरुणांचे म्हणणे आहे. ऑनलाइन खरेदीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी हप्त्यामध्ये वस्तू घेण्याची संधी दिली आहे.







दुकानात जाऊन तासभर वस्तू पाहून जास्त कमीत देऊन वस्तू घेण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग फायदेशीर असल्याचे तरुण सांगत आहेत.ऑनलाईन शॉपिंग सोईस्कर असते. आपण कधीही, कुठेही ऍपमधून खरेदी करू शकतो. बसल्या जागी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुठली वस्तू घेण्यासाठी कोणीही दबाव टाकत नाही. पैसे देण्याचे सुलभ पर्याय पण उपलब्ध आहेत.







एखादी वस्तू न आवडल्यास ती परत करता येते. या सगळ्या गोष्टी पाहता ऑनलाइन शॉपिंग पर्याय तयार झाला आहे.बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत.ऑनलाइन खरेदी ही संपूर्ण खात्रीशीररीत्या करता येत आहेत.






Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here