होमगार्डचे मानधन गेल्या 3 महिन्यापासून थकीत | दिवाळीच्या तोंडावर वेळेत पगार करण्याची मागणी

0



जत,प्रतिनिधी : राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस सेवा बजावणारे  होमगार्ड तीन महिन्यांपासून मानधनाविनाच काम करीत आहेत.कोरोनाचा सर्वाधिक धोका 50 वर्षांवरील व्यक्‍तींना असल्याने पोलिस महासंचालकांनी 46 वर्षांवरील होमगार्ड लोकांना ड्यूटीच दिली नाही. सुदैवाने कोरोनामुळे एकाही होमगार्डचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, गणेशोत्सव, नवरात्र महोत्सवात प्रत्येकी पाच दिवसांचा बंदोबस्त होमगार्ड लोकांना दिला जातो.







तसेच ईद, महापुरुषांच्या जयंत्यानिमित्तानेही त्यांना प्रत्येकी तीन दिवसांचा बंदोबस्त दिला जातो. होमगार्ड लोकांना प्रत्येक दिवशी किमान दहा तासांची ड्यूटी केल्यानंतर 670 रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र, कोरोनामुळे 25 मार्चपासून होमगार्ड लोकांची मदत बंदोबस्तासाठी घेतली जात आहे.



Rate Card





मात्र गेल्या तीन महिन्यापासून मानधनाविनच  काम करावे लागले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करत आहेत पण गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे मानधन न मिळाल्याने होमगार्ड यांची दिवाळी तिकट जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.