जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शनिवारी 9 रुग्ण आढळून आले आहेत.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या घटली असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. जत 3,वाळेखिंडी 3,गिरगाव 1,कासलिंगवाडी 2 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील संख्या यामुळे 1771 रुग्ण संख्या झाली आहे. त्यातील 1621 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्यात आतापर्यत 59 जणाचा मुत्यू झाला आहे. सध्या 91 जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात विना मास्क,गर्दी होत आहे.
कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासनाने दिलेले नियम नागरिकांसह व्यवसायिकांनी कडकपणे पाळावेत,मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटायझचा वापर करावा,असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.