जत,प्रतिनिधी : माजी सभापती प्रकाश जमदाडे यांची रेल्वे बोर्डाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते माजी जि.प.सदस्य रमेश पाटील,तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण,नगरसेवक स्वप्निल शिंदे,अँड.अण्णाराय जेऊर,सिध्दू शिरसाड,प्रवीण जाधव,सचिन होर्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान खा.संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक व भाजपचे नेते असलेले जमदाडे
यांचा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.