जत,प्रतिनिधी : शहरातून बिळूरच्या दिशेने निघालेला देशी दारूचे तीन बाॅक्स जत पोलिसांनी जप्त केले असून त्याची सुमारे 7 हजार 788 रूपये इतकी किंमत होते. गुरूवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत जत पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल शरद शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी मांतेश धुंडाप्पा धोडमणी (रा.बिळूर, ता. जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस सचिन हाक्के करत आहेत.







