रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार | जत तालुक्यात नियंत्रण सुटले | बिळूरमधील धान्याचा थागपत्ता नाही

0

जत,प्रतिनिधी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यातील स्वस्त अन्नधान्य योजनेचे राज्यात तीनतेरा वाजले आहेत. गरिबांसाठी 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवणाऱ्या या योजनेचा सर्वाधिक फायदा रेशनिंग दुकानदारांनाच होत असल्याचे व धान्याच्या काळाबाजाराचे भीषण वास्तव सातत्याने समोर येत आहे.बिळूरमधील घटनेनंतर रेशन दुकानातील गंभीर प्रकार समोर आला आहे. 

यापुर्वी आंवढी,करजगीतील धान्य दुकानातील कृष्णकर्त्ये पुरवठा विभागाचे नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बिळूर ता.जत येथे सापडलेल्या रेशनच्या सापडलेल्या धान्ये नेमके कोठून आले यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.जत तहसील मधील पुरवठा विभागाच्या वतीने तपास सुरू आहे.संशयित सापडल्याशिवाय काहीही सांगता येत नाही,असे जुजूबी प्रतिक्रिया देत‌ गार्भिंर्य नसल्याचे स्पष्ट केले.

जत तालुक्यात लॉकडाऊन काळात शासनाकडून गरिबांना आलेले धान्यावर डल्ला मारत काळा बाजारात विकले जात‌ असल्याचे प्रकार अनेक वेळा‌ समोर आले आहेत.
प्रत्येक गावातील धान्य दुकानातील धान्य कार्डधारकांना व्यवस्थित मिळते का याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.

Rate Card

जतच्या गोडावून मधून धान्य दुकानात धान्यपुरवठा केल्यानंतर काहीच दिवसांत ते संपल्याचे कारण देत दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास नकार देतात.काहीचे कार्डवर धान्य कमी आले म्हणून कमी धान्य‌‌ देतात मात्र काळ्याबाजारात धान्यपुरवठा करताना हवे तितके धान्य देण्यास दुकानदार तयार होत असल्याचे समोर येत आहे.सर्रास काळ्या बाजारात विक्री होणारे हे धान्य फक्त एवढाच की 2 व 3 रुपये किलो दराने मिळणाऱ्या गहू आणि तांदळासाठी 10 रुपये किलोने विकले जाते.
कोन झारीतील शुक्राचार्य


जत पुरवठा विभागातून जाणारे स्वस्तधान्य दुकानदाराकडून व्यवस्थित दिले जात‌ नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.मात्र जुजूबी कारवाई करून पुन्हा अशा दुकानदारांना पुरवठा विभागातून पाठीशी घालण्याचे प्रकार होत आहेत.यात आर्थिक लाभ हेच‌ कारण असल्याचे आरोप आहेत.त्यामुळे नेमके स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळ्या बाजारातील कोन आहेत, झारीतील शुक्राचार्य शोधून काढण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.