जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना महामारी व कोरोना कामगिरीवर असताना चार शिक्षकांचे मुत्यू झाले आहेत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आधारवड गेले आहेत.या मृत्यू झालेल्या तीन शिक्षकांना आर्थिक हातभार म्हणून प्रत्येकी 65 हजार प्रमाणे 2 लाख 60 हजार रूपयाची मदत देण्यात आली.
जत तालुक्यातील स्व.नानासो कोरे (डफळापूर),लिंगय्या जंगम (संख),रमेश हिरेमठ(मुचंडी) व धानाप्पा बाजी(जा.बोबलाद) या शिक्षक बांधवांचा कोरोना काळात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यांच्या कुंटुबियांना जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून ही मदत गोळा करून वितरित करण्यात आले.
प्रत्येकी 65 हजार रूपयाची ठेव पावती करून त्यांच्या वारसास सुपुर्द करण्यात आली.जि.प.सदस्य, माजी शिक्षण सभापती तम्मणगौडा रविपाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे,तालुकाध्यक्ष प्रमोद कोडग व पदाधिकारी उपस्थित होते.
डफळापूर येथील कोरोना योध्दा नाना कोरे यांच्या पत्नीला मदतीची पावती सुपुर्द करताना पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, विनायक शिंदे,प्रमोद कोडग व पदाधिकारी









