डफळापूर,वार्ताहर : प्रचंड दुरावस्था झालेल्या डफळापूर-अंनतपूर रस्त्याची पावसांने उघडीप दिली आहे.त्या काळात तातडीने दुरूस्ती करावी,अशी मागणी होत आहे. जत तालुक्यातील पश्चिम भागातील अंतरराज्यीय रस्ता जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने पाणंद रस्ता झाला आहे.
गत आठवड्यातील पावसाने या रस्त्याची दैना केली होती.दररोज अनेक वाहने रस्त्यावर अडकत होते.पावसात वाहनधारकांना रडकुंडीला आणलेला हा रस्ता आतातरी दुरुस्त करावा अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
डफळापूर-अंनतपूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे.







