जत,प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतीपिंकाचे पंचनामे करण्यात जतच्या कृषी विभागाकडून हलगर्जीपणा केला जात आहे.
मुर्दाड अधिकाऱ्यांच्या बेफीकीर पणामुळे कर्मचारी गावात जाऊनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे करत नसल्याचे आरोप होत आहेत.तालुक्यात मोठे नुकसान होऊनही नेमके नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. तर अनेक गावात पंचनामे करणारे कृषी सहाय्यक,ग्रामसेवक,तलाठी गायब झाल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील अनेक गावात तुफान अतिवृष्ठीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी उभे आहे.तेथील कणसे काढलीत म्हणून कृषी सहाय्यक पंचनामा करण्यात नकार देत आहे.प्रत्यक्षात पाणी उभे असलेल्या शेतातील पिक वाया गेले आहेत.शिवाय पुढील पेरणीही शक्य नाही.अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करणे गरजेचे आहे.मात्र त्यांबाबत आदेश नाहीत म्हणून वगळण्यात येत आहे.असा प्रकार थांबवावा,तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत,अन्यथा आंदोलन करू असा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला आहे.







