जत,प्रतिनिधी : बोर्गी बुद्रुक संरपच सौ.गुरनिंगव्वा श्रीशैल बिराजदार यांच्याविरूध सहा विरूध एक मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.एक सदस्य गैरहजर राहिला.आठ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत संरपचाविरोधात सहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.
संरपच गुरनिंगव्वा बिरादार या ग्रामपंचायतीत एकतर्पी कारभार करतात.विकासकामामध्ये सदस्यांनी मांडलेल्या मताकडे दुर्लक्ष करणे,सुचविलेल्या कामाचा विचार न करता मनमानी कारभार करत आहेत.ग्रामपंचायतीचा निधी ठराव न करताच खर्च करत आहेत.त्या निरक्षर असल्याने कारभार चालविता येत नाही.त्यांना मराठी भाषा येत नसल्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे.
जिल्हा परिषद,पंचायत समिती कडून आलेली शासकीय माहिती सदस्यांना न देणे,जेणे करून सदस्यांना विकास कामात विश्वासात न घेता कामे करत असल्याचे आरोप करत उपसंरपच राघवेंद्र होनमोरे,सदस्य दावल पुळुजकर,तम्माराया बिरादार,रियाना सनदी,सुशीला कोळी,गिरजाबाई कांबळे यांनी हा अविश्वास आणला होता.तो मंजूर करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.







