
जत,प्रतिनिधी : जत मधील प्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी पुन्हा एकदा महिला रुग्णाचे देवता ठरले आहेत.डॉ.आरळी यांच्या कै.सौ.शांताबाई शिवशंकर आरळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पुन्हा महिला रुग्णाचे वरदान ठरले आहे.सोलापूर येथील महिला रत्नाबाई जकाते (वय 45)यांच्या पोटातील 23 इंच बाय 22 इंच जाडीची 5 किलो वजनाची गाठ दोन तासाच्या अथक प्रयत्नासह डॉ.रविंद्र आरळी यांनी शस्ञक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढत जकातेना जीवदान दिले आहे.
जतसह सीमावर्ती महिलासाठी प्रस्तूती सह विविध आजाराचे उपचार केंद्र असलेले डॉ.आरळीचे हॉस्पिटल वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडवत आहे.
सोलापूर येथील महिला रत्नाबाई जकाते यांना पोटदुखीच्या गंभीर आजाराने व्याकुळ झाल्या होत्या.त्यांनी या आजाराठी अनेक हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतले होते.मात्र त्यांच्या आजाराचे निदान होत नव्हते.त्यांना डॉ.आरळी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखविण्याचा सल्ला काही महिलांनी दिला होता.
त्यानुसार जकाते या डॉ.आरळी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या.तेथे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.त्यात त्यांच्या पोटात सुमारे पाच किलो वजनाची गाठ असल्याचे निष्पण झाले आहे.डॉ.आरळी यांनी जकाते यांच्यावर शस्ञक्रिया करण्याचा निर्णय घेतला.तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नातर जकाते यांच्या पोटातून यशस्वीरित्या गाठ काढण्यात आली.
यापुर्वीही अशा अनेक महिलावर डॉ.आरळी यशस्वीरित्या शस्ञक्रिया करून जीवदान दिले आहे.पश्चिम महाराष्ट्रात महिलाच्या विविध आजार,गुंतागुतीच्या शस्ञक्रियेसाठी नावलौकिक मिळविला आहे.कोरोना काळातही डॉ.आरळी प्रभावीपणे रुग्णावर उपचार करत आहेत.तो जकाते यांना मिळालेल्या जीवदानानंतर कायम राखला आहे.
सोलापूर येथील रत्नाबाई जकाते यांच्या पोटातून काढलेली गाठ









