बिळूर प्रकरणातील संशयितास 12 ऑक्टोंबर पर्यत पोलीस कस्टडी

0



जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथील बापाच्या खूनप्रकरणी अटकेतील मुलास न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.






बिळूर येथील भिमू सत्याप्पा जामगोंड(वय 83) यांचा जमीन व मुलीला सोने दिले म्हणून त्यांचा मुलगा सदाशिव भीमू जामगोंड(वय 35,रा.बिळूर) मारहाण करत जन्मदात्याचाच खून केला आहे.


Rate Card





त्याप्रकरणी जत पोलीसांनी सदाशिव जामगोंड याला पकडत शुक्रवारी जत न्यायालयात उभे केले असता त्याला न्यायालयाने ता.12 ऑक्टोंबर पर्यत चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.अधिक तपास सपोनि कांबळे करत आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.